भाजपाचा विधानसभा कामकाजावर बहिष्कार: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी
भाजपचे बारा आमदार निलंबित केल्यामुळे खवळलेल्या भारतीय जनता पार्टी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.;
कामकाज सुरू होण्यापूर्वी मंडळाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.छगन भुजबळ आणि भास्कर जाधव यांच्या मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. आघाडी सरकार ओबीसी आरक्षण विरोधी असल्याचे भाजपचे आमदारांचे म्हणणे होते.
राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी काल प्रचंड गदारोळ झाला होता.
त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं.