धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अन्यथा मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही - ऍड. स्वाती शिंदे

ज्या खात्याने समाजाला न्याय द्यायचा त्याच खात्याच्या मंत्र्याने समाजावर अन्याय करण्याचं काम केलं आले. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आज सांगली येथील भाजप महिला आघाडीतर्फे अप्पर तहसील कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.

Update: 2021-01-18 09:15 GMT

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले. पण बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेच्या विरोधात मुंडे यांचे मेव्हणे पुरुषोत्तम केंद्रे, भाजप नेते कृष्णा हेगडे यांसह अनेकांनी त्या आम्हालाही ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर मात्र या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रमुख शरद पवार यांनी देखील तपास झाल्यानंतर निर्णय घेऊ असे सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी पक्ष त्यांचा राजीनामा घेणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

मुंडे यांचा राजीनामा घ्यावा या मागणी साठी आज संपूर्ण महाराष्ट्र भर भाजप महिला आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. सांगली येथे देखील अप्पर तहसील कार्यालया समोर या मागणी साठी निदर्शने करण्यात आली. यावेळी मुंडे यांनी केलेल्या अत्याचाराविरोधात एफआयआर नोंद व्हावी तसेच मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा. घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी त्वरित धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा. अशी मागणी भाजप महिला आघाडी तर्फे नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे यांनी केली.

राजकीय दबाव टाकून महिलांवर अन्याय करण्यात येत असून पीडित महिलेचा एफआयआर देखील दाखल करून घेतला जात नाही आहे. पाच मुलं असल्याचं मुंडे यांनी काबुल केलं आहे पण प्रतिज्ञा पत्रात मात्र तीनच मुलांचा उल्लेख करून त्यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अश्या खोटरड्या नेत्याचा राजीनामा घ्यावा अन्यथा या मंत्र्याला व सरकार मधील लोकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी शिंदे यांनी दिला. यावेळी नगरसेविका ऍड स्वाती शिंदे यांच्यासह भाजप महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:    

Similar News