Bihar Election: दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, तेजस्वी यादव चे भवितव्य होणार EVM यंत्रात कैद

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, तेजस्वी यादव सह दिग्गज मैदानात, दुसऱ्या टप्प्यात किती मतदार संघासाठी पार पडतंय मतदान?;

Update: 2020-11-03 03:43 GMT


बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 28 ऑक्टोबरला पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज 3 नोव्हेंबरला पार पडत आहे.. एकूण 243 मतदार संघ असलेल्या बिहार विधानसभेसाठी 28 (ऑक्टोबर) पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यामध्ये 71 जागांसाठी मतदान पार पडले होते. तर आज एकूण ९४ जागांवर मतदान होत आहे. यात १४५३ उमेदवार मैदानात आहेत. साधारण पणे 7 कोटी 30 लाख मतदार निवडणुकीत आपला हक्क बजावणार आहेत.

विशेष बाब म्हणजे दुसऱ्या टप्प्यात महागठबंधनचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव देखील मैदानात असून त्यांचं भविष्य देखील आज EVM यंत्रात कैद होणार आहे.

भाजप, कॉंग्रेस, चिराग पासवान यांचा लोकजन शक्तीपक्ष, नितीश कुमार यांचा जनता दल (युनाटेड), तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हे पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत.

मात्र, खरी लढाई तेजस्वी यादव vs नितीश कुमार असल्याची पाहायला मिळत आहे. कोरोना काळात होणारी ही देशातील पहिलीच निवडणूक असल्याने मतदार नक्की कोणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दुसरा टप्पा कोणत्या पक्षाचे किती उमेदवार मैदानात?

भाजपचे 46

जेडीयूचे 43

आरजेडीचे 56,

काँग्रेसचे 24

आणि डाव्या पक्षांचे 14 उमेदवार

पहिल्या टप्प्यात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार मैदानात...

जनता दल: 35

भाजप: 29

राष्ट्रीय जनता दल: 42

कॉंग्रेस: 20

लोकजनशक्ती पार्टी: 41

किती टप्प्यात मतदान...

निवडणूक तीन टप्प्यात पार पडत आहे.

पहिला टप्पा: 28 ऑक्टोबर

दुसरा टप्पा: 03 नोव्हेबर

तिसरा टप्पा: 7 नोव्हेबर

10 नोव्हेबरला निकाल...

Tags:    

Similar News