मनसेला धक्का! 'उत्तर'सभेचा उतारा, 35 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
मनसेच्या (MNS) गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणानंतर राज्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मनसेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.;
राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर (Raj Thackeray speech ) राज्यभरातून सडकून टीका झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तरसभेतून केलेल्या आरोपांना उत्तर दिले. मात्र तरीही राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेवरून त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा द्यायला सुरूवात केली. तर मनसे नेते वसंत मोरे यांनीही राज ठाकरे यांच्या भुमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मात्र वसंत मोरे यांची नाराजी दुर करणाऱ्या मनसेतील 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. (Muslim leader resign a party membership)
राज ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेवर नाराजी व्यक्त करत राज्यातील 35 जिल्ह्यांच्या वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. तर राज ठाकरे यांच्या उत्तर सभेनंतरही मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू असल्याने मनसेपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (35 MNS leader give resign)
राज ठाकरे यांनी मनसेच्या उत्तरसभेत 3 मे पर्यंत राज्य सरकारने मशिदींवरील भोंगे काढावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा पठन करण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे नाराज झालेल्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्र उगारले. त्यामध्ये पुणे शहरातून 2 तर राज्य सचिव इरफान शेख आणि त्यापाठोपाठ आता मनसेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे राजीनामा पाठवला आहे. तर हा मनसेच्या उत्तरसभेचा उतारा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.