काँग्रेसला झारखंडमधून मोठा फटका; माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा भाजपात प्रवेश

Update: 2024-02-26 09:51 GMT

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला झारखंडमधून मोठा फटका बसला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या पत्नि खासदार गीता कोडा यांचा आज (26 फेब्रुवारी) भाजपात प्रवेश झाला आहे. झारखंडमधील रांची येथील भाजपा कार्यालयात राज्याचे भाजप प्रमुख बाबूलाल मरांडी यांच्या उपस्थितीत गीता यांनी प्रवेश केला असल्याचे वृत्त आहे.

झारखंडमधील सिंहभूम मतदारसंघाच्या गीता कोडा या खासदार आहेत. झारखंडमधील काँग्रेस, जेएमएम आणि आरजेडी युतीवर खासदार गीता कोडा यांची नाराजी वाढली होती अशी प्राथमिक माहिती आहे. लोकसभा निवडणूकीपू्र्वी त्यांचं भाजपमध्ये जाणं काँग्रेसला मोठा फटका असल्याचं मानलं जात आहे. माजी मुख्यमंत्री मधु कोडा हे पत्नी गीता कोडासह भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पक्ष कार्यालयात पोहचले आहेत, अशी माहिती देखील माध्यमांकडून देण्यात आली आहे.


Tags:    

Similar News