Prakash Ambedkar on Chhagan Bhujbal - ओबीसींसाठी भुजबळांनी आपला राजीनामा फेकून द्यावा
गेल्या काही महिन्यांपासून आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी वाद चांगलाचं पेटला आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश जरी काढला असला तरी यावरून ओबीसी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. यापार्श्वभूमीवर ओबीसींसाठी छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा का देत नाहीत? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वाशिम येथे माध्यामांशी बोलताना केला आहे.
दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले की " छगन भूजबळ हे सरकारमध्ये कॅबीनेट मध्ये आहेत. ते ओबीसींसाठी राजीनामा का देत नाही. एका बाजूला मंत्रीमंडळातलं सर्व खायचं दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने राहायचे. छगन भुजबळ यांनी ओबीसींसाठी आपला राजीनामा फेकून द्यावा, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात आंबेडकर म्हणाले की, आम्ही पत्र जाहीर केलेलं आहे. त्यांचे प्रवक्ते म्हणाले की आमचं २४, २४ असं जागावाटप झाल्याचं म्हटलंय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही, सगळे पक्ष स्वतंत्र लढतील. विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप-शिंदे-पवार हे सुध्दा वेगवेगळे लढतील असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत