Baramati Loksabha | अजित पवारांची सुप्रिया सुळेंवर टीका, तर सुळेंचं टीकेला प्रतिउत्तर...!
सध्या राज्यात लोकसभा निवडणूकीच्या तयारीला सगळेच पक्ष मोठ्या जोमाने लागले आहेत. प्रचार, जाहीर सभा, आणि एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत जो तो पक्ष आपली भूमिक मांडण्याच्या कामात अग्रेसर आहे. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले की, काहींना संधी मिळाली पण त्या संधीचे त्यांना सोने करता आले नाही. त्या काळामध्ये ते मंत्री होऊ शकले असते, मंत्री झाल्यावर आपण लोकांचे प्रश्न सोडून शकतो. प्रशासनावर एक चांगली पकड निर्माण करू शकतो. पण त्यांना संधीचे सोने करता आलं नाही, असं अजित पवार म्हणाले.
तर, अजित पवारांच्या या टीकेला राष्टवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. या देशात अनेक मंत्री होऊन गेले आहेत. मात्र, मंत्री नसतानाही चांगले काम केलेल्या नेत्यांची नावं आजही अभिमानाने घेतली जातात. ते कधीही मंत्री नव्हते, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून पवार विरूध्द पवार असा अटीतटीचा सामना रंगलेला आहे. सुनेत्रा पवार विरूध्द सुप्रिया सुळे अशी ही लढत आहे. यामध्ये अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना दिसत आहेत, तर शरद पवार हे मुलगी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना दिसत आहेत.