सनातन विचारधारे विरोधात बंजारा एकवटला
एकापाठोपाठ बहुजनवादी व्यवस्थेचा ताबा घेण्याची सुरुवात सनातनी विचारांनी केली असून आता सेवागड ते पोहरागड बंजारा गोर धर्म रक्षण यात्रेच्या माध्यमातून पोहरादेवी चे महत्व नष्ट करणाऱ्या सनातनी विचारा विरोधात गोर बंजारा समाज एकवटला आहे.;
एकापाठोपाठ बहुजनवादी व्यवस्थेचा ताबा घेण्याची सुरुवात सनातनी विचारांनी केली असून आता सेवागड ते पोहरागड बंजारा गोर धर्म रक्षण यात्रेच्या माध्यमातून पोहरादेवी चे महत्व नष्ट करणाऱ्या सनातनी विचारा विरोधात गोर बंजारा समाज एकवटला आहे.
पोहरादेवीचे महत्व नष्ट करण्याच्या प्रयत्नाविरुध्द बंजारा समाजात संतापाची लाट देशभरात उसळली आहे. दिनांक 16 डिसेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या सहविचार सभेत संपुर्ण राज्यातून आलेल्या बंजारा बांधवांनी आपले सडेतोड विचार समाजासमोर मांडले.
भाजपा तसेच संघ परीवार बंजारा समाजाची सनातन गोर बंजारा अशी नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.याचा विरोध देशांतील सर्व समाज बांधवांनी करावं असे मुंबईतील सहविचार सभेत आवाहन केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार यांनी दिली आहे.
भाजपाने जळगाव जिल्हयातील गोद्री येथे कुठलाही धार्मीक आधार नसलेल्या ठिकाणी बंजारा समाज महाकुंभ मेळाव्याचे आयोजन केले आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून भाजपा तसेच संघ परीवार बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. काही समाज विघातक गोर बंजारा समाजामध्ये काही समाज विघटकांनी गोर बंजारा समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र रचले आहे.
या षडयंत्राविरुध्द बंजारा समाज एकवटला आहे. संघ आणि भाजपाचा कपटी डाव हानुन पाडण्यासाठी यात्रेत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित या सभेला देशभरातील अनेक समाज सुधारक, विचारवंत साहित्यिक उपस्थीत होते. पुरोगामी विचाराच्या बंजारा समाजाची सनातनी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न मान्य याप्रसंगी बंजारा बांधवांनी सांगीतले. या षडयंत्राविरुध्द दिनांक 15 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यन्त महाराजांचे जन्मस्थान सेवागड ते समाधीस्थळ पोहरागड गोर बंजारा धर्मरक्षण यात्रा व महाभोग भंडारा आयोजित केल्याची माहिती देवानंद पवार यांनी दिली.