बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी केली नव्हती - उद्धव ठाकरे

Update: 2023-09-02 13:26 GMT

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवा सेनेच्या बैठकीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधार्‍यांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना त्यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे. भाजप म्हणजे भाड्याने जमवलेला पक्ष, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की "तुमच्याकडे आलेल्या सगळ्यांना क्लीनचीट देताय मग लॉन्ड्री का काढत नाही. असा सवाल ठाकरे यांनी केलाय. माझ्या शिवसैनिकांना छळायचे. किशोरीताई, संजय राऊत यांना छळायचे. तुमचेही दिवस येतील. तुम्हालाही आत जावे लागेल. मशाल ही आग आहे. या आगीशी खेळू नका, थोडे दिवस राहिलेत आराम करा. हेलिकॉप्टरने शेतात जा असा घणाघात उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपाला नरेंद्र मोदींशिवाय दुसरा पर्याय नाही. आता बाळासाहेब ठाकरेंचाही फोटो लावावा लागतोय. बाळासाहेब ठाकरे एकमेव हिंदुह्दयसम्राट झाले. त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही आहात. स्वातंत्र्य लढ्यात चले जावमध्ये भाजपा आणि त्यांची मातृसंस्थाही नव्हती. बंगालच्या फाळणीला श्यामप्रसाद मुखर्जी यांनी पाठिंबा दिला होता. कोणत्या विचारातून तुमचा पक्ष जन्माला आलाय. तुम्हाला माझे वडील चोरावे लागतात. ही वैचारिक दारिद्र्य आहे. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी केली नव्हती अशा शब्दात ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. होऊ दे चर्चा या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. त्याचसोबत आम्ही भाजपाला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले नाही. आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले बोलले जाते. भाजपा म्हणून हिंदुत्व नाही. जालनातील ज्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्या माताभगिनीकडून राखी बांधून घ्या. सरकार आपल्या दारी या लोकांना दारात उभे करू नका हाकलून द्या. अडीच वर्षाच्या काळात एकही दंगल होऊ दिली नाही. आंदोलकांशी चर्चा का केली नाही. आंदोलनाला बसलेत त्यांच्याशी बोलायला वेळ नसेल तर सरकार चाटायचे आहे का? आजपर्यंत मराठा आंदोलने निघाली, मोर्चे काढली पण कुठेही शांतता भंग केली नाही. गेल्या दीड वर्षात मराठा आरक्षण का दिले नाही? असा सवाल त्यांनी केला.

Tags:    

Similar News