अन्याय अत्याचार संपता संपेना....

Update: 2021-07-12 17:01 GMT

रमाबाई आंबेडकर हत्याकांडाला 24 वर्ष पूर्ण होऊन 25 व्या वर्ष सुरू झाले, अध्याप न्याय नाही , आरोपी पोलीस निरीक्षक मनोहर कदम मोकाट आहे, त्याला कसली ना जरब बसली ना भीती. इतकेच नव्हेतर नरेंद दाभोळकर यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीना प्रशिक्षित करण्याचे काम मनोहर कदम याने केल्याची माहिती समोर येते आहे, दुसरीकडे राज्यात अनुसूचित जाती जमाती , आदिवासी आणि भटके विमुक्ता वर होणाऱ्या अत्याचाराचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

बातमी वाशीम जिल्यातील अनसिंग गावातली आहे आदिवासी समाजातील ऊस तोड कामगार कुटुंबातील 15 वर्षाच्या तरुणीला ऊस तोड ठेकेदार यांच्या मुलाने प्रेमाचे नाटक करून लग्नाचे आमिष दाखवले आणि मुलीचे अपहरण केले. तिच्यावर बलात्कार केला आणि पुढे लग्न करून गळ्यात ही ब्याद नको म्हणून मारून टाकले आणि विहिरीत आत्महत्या केल्याचा बनाव केला.

पोलीस त्यांच्या स्वभाव प्रमाणे आदिवासी किंवा अनुसूचित जातीवर करण्यात आलेला अत्याचार हा त्यांना अत्याचार वाटतं नाही. किंवा आरोपीने लाच देऊन त्यांचे हात, पाय डोळे आणि मेंदू बंद केल्यावर त्यांना गरीब आदिवासी मुलीला देखील इज्जत असते असे वाटत नाही त्यामुळे खुनाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असा थातूर मातूर गुन्हा मे महिन्यात घटना घडल्याचा 3 दिवसांनी नोंदविला. पोलिसांनी आपली सर्व अक्कल, कायदा आणि हुशारी या कामी लावली. ज्यावेळी "डॉ आंबेडकर आर्गेनाइजेशन फ़ॉर पीस एंड जस्टिस" या मानवधिकारासाठी काम करणाऱ्या संघटनेचे विनोद ताटके यांना हा प्रकार समजला तेंव्हा त्यांनी कुटुंबाची त्यांच्या गावी आदिवासी पाड्यावर जाऊन भेट घेतली. पोलिसांनी नोंदवलेली तक्रार पाहिली तर पोलिसांनी अक्षरश: आदिवासी कुटुंबाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन थातूर मातूर गुन्हा नोंदवला होता, वास्तविक यामध्ये अट्टरोसिटी, पोक्सा आणि खुनाचा गुन्हा दाखल करने गरजेचे होते . विनोद ताटके यानी यासंदर्भात कुटुंबाकडून संपूर्ण माहिती घेतली ती याप्रकारे होती.

अनसिंग या वाशीम जिल्ह्यातील हे आदिवासी कुटुंब ऊसतोडी च्या कामावर सोलापूर येथील ठेकेदार सुधाकर पवार यांच्याकडे दर मोसमात जात होते, यावर्षी पण गेले, यावेळी त्याचा मुलगा अविनाश पवार याची नजर य्या आदिवासी कुटुंबातील इयत्ता नववीत शिकणाऱ्या 15 वर्षाच्या मुलीवर पडली, त्याने तिला प्रेमात फसवले ,हे जेंव्हा आदिवासी कुटुंबाला समजले , तर ते आपली इज्जत वाचवण्यासाठी ऊसतोडीचे काम सोडून अनसिंग गावी परत आले, मात्र बलात्कारी अविनाश पवार याने कुटुंबाचा पाठलाग करीत गावी आला आणि मुलीला घरातून रात्रीच्या वेळी पळवून नेले.

यासंदर्भात आदिवासी कुटुंबाने वारंवार पोलिसांना आपली तक्रार दिली, आरोपीचे नावे पत्ता दिले, मात्र पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलण्या ऐवजी आरोपीने मुलीवर बलात्कार जरून मारून टाकण्याची वाट पाहत होते.

आदिवासी कुटुंबाला तुमची मुलगी सुरक्षित आहे, आम्ही तुमची मुलगी जीवंत आणून देवू असेच सांगत राहिले , आणि नंतर मुलीने आत्महत्या केल्याचे पोलीस पोलिसांनी सांगितले. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून एक आरोपी अविनाश पवार याला अटक करून गप्प बसले होते

याच्या विरोधात डॉ आंबेडकर आर्गेनाइजेशन फ़ॉर पीस एंड जस्टिस ने यासंदर्भात वाशिमचे पोलिस अधीक्षक, इतर विभागांच्या भेटी घेवून त्यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली त्यानंतर पोलोस प्रशासन हलले आणि या प्रकरणात अट्टरोसिटी, खून, पोक्सा कलम लावण्यात येवून आरोपीचा भाऊ, वडील आणी इतर असे आरोपी म्हणून नोंद करण्यात आली. मात्र एक आरोपी अटक करून आजही वाशिम पोलिस गप्प बसले असून इतर आरोपी आजही मोकाट आहे

अनुसूचित जाति जमाती आणि आदिवासी यांची गरीबी, अज्ञान, राजकीय पाठबळ नाही आणि सुरक्षा देखील नाही त्याबरोबर हातावर पोट असल्याने त्याना सारखे पोलिस ठाण्यात फेर्या मारता येत नाही आणि कोर्टात बड़ा वकील लावता येत नाही. यासर्व प्रकाराने आरोपी काही महिन्यात बाहेर येतो

यामुळे अनुसूचित जाति जमाती वर होणारे अत्याचाराच्या घटनांमधे मध्ये वाढ होत आहे. लॉक डाउन मध्ये खरतर घटना व्हायला नको होत्या संपूर्ण जग महामारित होते, मात्र या महामारीत देखील अनुसूचित जाती जमाती व आदिवासी वरील अत्याचार झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंद रजिस्टर मधील आकडेवारी सांगते.

Tags:    

Similar News