जलयुक्त शिवार योजनेवर आरोप म्हणजे, ठाकरे सरकारचा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न!- शेलार

Update: 2021-07-21 18:29 GMT

मुंबई // "जलयुक्त शिवार योजनेमध्ये अनियमितता बघणे म्हणजे ठाकरे सरकारचा केवळ बदनामीचा खेळ सुरू आहे" असं मत भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे. जलयुक्त शिवार योजना म्हणजे महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीतील एक मोठी लोकचळवळ होती. मात्र, या योजनेत अनियमितता बघत देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला बदनाम करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न असल्याचे शेलार यांनी म्हंटले आहे. याबाबत आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी म्हंटले आहे की, "किमान अन्नदात्याच्या पोटावर पाय देण्याचे पाप ठाकरे सरकारने करू नये"

मुख्य जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांवर होती

जलयुक्त शिवार योजना ही जिल्हा परिषद, कृषी खाते, जलसंधारण विभाग, लघु पाटबंधारे, वनखाते अशा विविध 7 खात्यांमार्फत राबविली गेली. त्यामुळे या खात्यांच्या स्थानिक अधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांच्या अंतर्गत काम करण्याचे अधिकार देण्यात आले होते. ही योजना प्रभावीपणे कशी राबवली जाईल याची मुख्य जबाबदारी ही त्या- त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांवर होती.

भाजप सरकारच्या काळातच झाली होती कामांची चौकशी(

)ज्यात जलयुक्तची एकूण 6.5 लाख इतकी कामे झाली होती. ज्यात एका कामाच्या किंमतीची सरासरी ही दीड लाख रूपये येते. यात चौकशी झालेली प्रकरणे 950 आहेत. त्यातील 650 कामांची चौकशी भाजप सरकारच्या काळातच करण्यात आली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकरणात अनियमितता आढळली त्यात चौकशीचे आदेश दिले होते असे शेलार यांनी म्हंटले आहे.

Tags:    

Similar News