कोरोनामुळं विधिमंडळाचे अधिवेशनही अल्पकालीन?
कोरोनामुळे मुळे जगभरातील संसदीय कामकाजाचा कालावधी कमी झाल्यामुळे लोकशाही संकटात असल्याची भावना व्यक्त होत असताना महाराष्ट्रातही पुन्हा एकदा विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आंकुचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.;
गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे अधिवेशन कमी कालावधीचे घेण्यात आले. आता जुलैमध्ये होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राज्य सरकारने जास्त कालावधीचे घेणे आवश्यक असल्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त आहे.
विधिमंडळाचे कामकाज सात जुलै पासून सुरू होईल. पहिल्याच दिवशीविधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडेल. काँग्रेस नेत्यांकडून त्यासाठी लॉबिंग सुरू करण्यात आले आहे. संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांची नावं चर्चेत असून कदाचित एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन विधानसभा अध्यक्षपद दिलं जाईल अशीही चर्चा रंगली आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation), ओबीसी आरक्षण (OBC Reservation), पदोन्नतीमधील आरक्षण, चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, सरकारमधील मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्द्यांवरून ठाकरे सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून केला जाण्याची शक्यता आहे.
मागील अधिवेशनात सचिन वाजे प्रकरणावरून सरकारची चांगलीच पंचाईत झाली होती त्या नंतरच्या काळात गृहमंत्री आणि देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. रवींद्र वायकर अनिल परब यांच्यासारख्या नेत्यांवर आरोप असून भाजपचे नेते पुन्हा त्यांना टार्गेट करण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनात कमी कालावधी करण्यासाठी आघाडीचे नेते प्रयत्नशील असतील तर जास्तीत जास्त काम काज करावी असा विरोधकांचा आग्रह राहील.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवण्याबरोबरच कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत विधिमंडळाचे कायदे लक्षवेधी तारांकित सूचना आणि पुरवणी मागण्यांवर ती चर्चा होईल असे प्रयत्न आहेत.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/349092929907588/