अरविंद केजरीवाल यांचा तुरूंगातून देशवासीयांना संदेश

Update: 2024-03-23 11:33 GMT

आम आदमी पार्टीचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी ईडी कडून अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी तुरूंगातूनच देशवासीयांसाठी एक संदेश पाठवला आहे.

त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी आज (शनिवारी) हा संदेश जनतेला वाचून दाखवला आहे.

केजरीवाल म्हणतात....

माझ्या प्रिय देशवासियांनो...मला काल अटक करण्यात आली. मी आत राहलो काय किंवा बाहेर राहीलो काय, प्रत्येत क्षणी देशाची सेवा करीत राहील. माझ्या आयुष्याचा एक-एक क्षण देशासाठी समर्पित आहे. माझ्या शरीराचा एक-एक अवयव देशसेवेसाठी कार्यरत राहील. या पृथ्वीतलावर माझा जन्मच संघर्षासाठी झालेला आहे. आतापर्यंत खूप संघर्ष केले. पुढे सुद्धा माझ्या आयुष्यात मोठ मोठे संघर्ष लिहिलेले आहेत. त्यामुळे ही करण्यात आलेली अटक मला अचंबीत करत नाही.

आपल्याकडून मला खूप प्रेम मिळालेलं आहे. मागच्या जन्मी मी खूप पुण्यकर्म केले असावेत, ज्यामुळे मी भारतासारखा महान देशात जन्माला आलो. आपल्या सर्वांना मिळून पुन्हा एकदा भारताला महान बनवायचं आहे. जगातला सगळ्यात शक्तीशाली आणि पहिल्या क्रमांकाचा देश बनवायचं आहे. भारताच्या आत आणि बाहेर खूप साऱ्या अशा शक्ती आहेत, ज्या देशाला आतून कमकुवत करत आहेत. आम्हाला सावधान राहून या शक्तींना ओळखावं लागणार आहे. या शक्तींना हरवावं लागणार आहे, आणि भारतातच खूप सारे असे लोक आहेत, जे देशभक्त आहेत, जे भारताला पुढे नेऊ इच्छितात, शक्तींसोबत जोडावं लागणार आहे.

दिल्लीतल्या माझ्या माता भगिनी म्हणत असतील, केजरीवाल तर तुरूंगात गेला..! काय माहित आता १००० रुपये मिळतील की नाही? माझं सगळ्या माता-भगिनींना आव्हान आहे की, आपला भाऊ आणि आपल्या मुलावर विश्वास ठेवा. तुरूंगाचे असे कुटले गज नाहीत जे मला आत डांबू शकतील..! मी लवकरच बाहेर येईल. आणि आपलं वचन पूर्ण करेन. आजपर्यंत असं कधी झालंय की, केजरीवाल ने कुठलं वचन दिलं आणि ते पुर्ण नाही केलं? आपला भाऊ, आपला मुलगा पोलादी बनलेला आहे. अतिशय मजबूत आहे. फक्त एक विनंती आहे, एकवेळ मंदीरात अवश्य जावे, आणि परमेश्वराकडे माझ्यासाठी आशीर्वाद मागावा. कोट्यावधी लोकांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि हीच माझी ताकद आहे.

आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा माझं आवाहन आहे, की माझं तुरूंगात जाण्यामुळे देशसेवा, समाज सेवा आणि लोकसेवेचं काम थांबलं नाही पाहिजे. आणि हो... भाजपवाल्यांचा तिरस्कार नाही करायचा. ते सर्व आपले बांधव आहेत. मी लवकरच वापस येईल.

आपलाच

अरविंद केजरीवाल.

जय हिंद 


Tags:    

Similar News