कारवाईच्या भीतीने भुजबळांनी पवारांची साथ सोडली, अंजली दमानिया यांचा आरोप

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या घटनेला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. यात पक्षातील बहुतांशी ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. त्यात एक महत्त्वाचं नाव होतं छगन भुजबळ यांचं. त्याच भुजबळांनी शरद पवार यांची साथ का सोडली, याविषयी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलंय.;

Update: 2023-10-11 15:05 GMT

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या घटनेला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. यात पक्षातील बहुतांशी ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. त्यात एक महत्त्वाचं नाव होतं छगन भुजबळ यांचं. त्याच भुजबळांनी शरद पवार यांची साथ का सोडली, याविषयी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलंय.

शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मागील ३३ वर्षांपासून छगन भुजबळ हे शरद पवारांसोबत आहेत. पवारांनीही भुजबळांना उपमुख्यमंत्री, गृहमंत्री अशी महत्त्वाची पदं दिली. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी भुजबळांना तुरूंगवासाची शिक्षा झाली तेव्हाही पवार कुटुंबातील सदस्यांनी त्यांची सातत्यानं आस्थेनं विचारपूसही केली. त्यानंतर न्यायालयानं त्यांना जामिन दिला आणि भुजबळ तुरूंगाबाहेर आले. त्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आणि भुजबळ महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीही झाले. पुन्हा तीन महिन्यांपूर्वी जेव्हा अजित पवारांनी समर्थक आमदारांना सोबतीला घेऊन महायुतीला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झाले. तेव्हा छगन भुजबळ त्यांच्यासोबत दिसले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.


 



ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपांमुळं छगन भुजबळांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्याच महाराष्ट्र सदन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करण्याची परवानगी १२ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागानं दिली होती. त्यासंबंधीचा शासन आदेशच अंजली दमानिया यांनी ट्विट केलाय. भुजबळांनी शरद पवारांसोबतची ३३ वर्षांची साथ का सोडली त्याचं खरं उत्तर हा जीआर असल्याचं ट्विटच अंजली दमानिया यांनी केलंय. १२ एप्रिलच्या जीआरमध्ये भाजपनं भुजबळांना पुन्हा चौकशीचा धाक दाखवला भाजमध्ये या नाहीतर जेल मध्ये जा ? असा गर्भित इशाराच भाजपनं भुजबळांना दिल्याची शंका दमानिया यांनी ट्विटमधून व्यक्त केलीय.



Tags:    

Similar News