मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांच्या खुनाच्या प्रकरणात परमबीर सिंह यांची भूमिक संशयास्पद असल्याने त्यांची बदली केली गेली, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. तसेच त्यांची बदली केल्यानेच त्यांनी आपल्यावर गंभीर आरोप केले होते, असेही देशमुख यांनी सांगितले होते. त्यामुळेच या प्रकरणात आपल्याला न्याय मिळावा यासाठी हायकोर्टात याचिका केल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. आता परमबीर सिंह याच्यावर एनआयएच्या आऱोपपत्रात जी माहिती देण्यात आली आहे, ती पाहता देशमुख यांनी परमबीर सिंह यांच्यावर केलेली कारवाई योग्य होती का, अशी चर्चा सुरू झाली आहे.