अमरावतीमध्ये कमल 144 लागू, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे जनतेला शांततेचं आवाहन
अमरावतीमध्ये कमल 144 लागू, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे जनतेला शांततेचं आवाहन
त्रिपुरामध्ये मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात राज्यातील मुस्मीम बांधवांनी शुक्रवारी 12 नोव्हेंबरला बंदचं आवाहन केलं होतं. या बंद दरम्यान राज्यातील काही शहरांमध्ये हिंसक वळण लागलं आहे.
अमरावतीमध्ये आज सकाळी दहा वाजता शहरातील प्रमुख चौकात हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना काहींनी घटनास्थळी उपस्थित पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. गर्दी पाहता ग्रामीण भागातूनही शहरात फौजफाटा मागवण्यात आला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी फेसबूकवरुन जनतेशी संवाद साधला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आली असल्याची माहिती जनतेला दिली.
अमरावतीमधील परिस्थिती नियंत्रणाखाली येत आहे. माझी सर्व अमरावतीकरांनी विनंती आहे, त्यांनी शांतता व संयम पाळावा. माध्यमांनी देखील दूरचित्रवाणीवर अप्रिय घटनांची दृश्ये दाखवतांना त्यावर वेळ नमूद करावी, जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. परिस्थिती चिघळेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये किंवा सोशल मिडीया पोस्ट कोणीही करू नयेत. अमरावती हे औद्योगिक शहर आहे, या जिल्हाला मोठा सांस्कृतिक-सामाजिक वारसा आहे. अमरावतीच्या लौकिकाला गालबोट लागणार नाही. याची काळजी आपण सर्व जण घेऊया."
असं आवाहन यावेळी यशोमती ठाकूर यांनी जनतेला केलं आहे.