अमरावती जिल्हा बँकेवर यशोमती ठाकूर गटाचे निर्विवाद वर्चस्व, बच्चू कडू यांच्या गटाचा पराभव

Amravati District Central Co-operative Election yashomati thakur panel Win

Update: 2021-10-05 13:09 GMT

अमरावती जिल्हा सहकारी बँकेवर पुन्हा एकदा कॉंग्रेसने वर्चस्व मिळवलं आहे. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पॅनलचा पराभव केला आहे. मात्रपरिवर्तन पॅनलचे राज्य मंत्री बच्चू कडू यांनी (Bacchu Kadu)विजय त्यांच्या गटातून निवडून आले आहेत. दरम्यान गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा बॅंकेवर ठाकूर गटाची सत्ता कायम राखण्यात मंत्री यशोमती ठाकूर यांना यश आले आहे.

यावेळी बोलताना जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि महिला बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितले की,

" हा विजय गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचा आहे. मतदारांनी आमच्या कामावर कामावर विश्वास ठेवला. यापुढे जिल्ह्यातील महिला बचत गटांना कशा प्रकारे मदत करता येईल तसेच सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, याबाबत आम्ही सातत्याने प्रयत्नशील असू. शेतकरी आणि महिलांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही ठाकूर यांनी दिली. तर केंद्र आता कोणत्याही बाबतीत ईडीची भीती दाखवत आहे. उद्या एखाद्या सरपंचाला ईडीची नोटीस आली तर आश्चर्य वाटायला नको" असा टोला लगावत ईडीकडून होत असलेल्या कारवाईची यावेळी त्यांनी खिल्ली देखील उडवली.

Tags:    

Similar News