अमित शहा यांच्या 'देखेंगे'मुळं फडणवीस सरकारचा गर्भपात
अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली होती, चंद्रकांत पाटील बोलता बोलता बोलून गेले...
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत मी खोलीचं राजकारण करत नाही, असं म्हणत शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर पहिल्यांदाच महाराष्ट्रात येऊन भाष्य केलं होतं. विधानसभा निवडणुका एकत्र लढणाऱ्या शिवसेना भाजपची युती मुख्यमंत्री पदाच्या वादावरून तुटली होती. निवडणुकीपुर्वी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचं ठरले असल्याचा दावा शिवसेनेनं केला होता.
मात्र, भाजपने हा दावा फेटाळून लावला होता. अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं इतक्या दिवस भाजपकडून वारंवार सांगण्यात येतं होतं. मात्र, अशी चर्चा झाल्याचं आज चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यातून पहिल्यांदाच स्पष्ट झालं आहे. चंद्रकांत पाटील आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
यावेळी पत्रकारांनी त्यांना जिल्हा परिषदेच्या बदलाबाबत काही मागण्या काही सदस्यांनी केल्या का? असा सवाल केला असता...
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी...
हो आज मी सगळ्याचं मनोगत समजून घेतलं. जिल्ह्याची कोअर कमिटीची बैठक केली. आणि माझं आणि देवेंद्रजींचं असं ठरलं आहे. की, साधारण काय मनोगत आहे. ते सांगून 23 तारखेला महापौर निवडणूक झाली की, याचा विचार करु. अशी माहिती दिली...
यावर पत्रकारांनी क्रायटेरिया काय लावणार आहे? असा सवाल केला असता... आज मी लोकांचं मानसं समजून घेतलं. आणि 23 तारखेला महापौर इलेक्शन झाली की, या विषयामध्ये पुन्हा एकदा बसून काय करायचं याचा निर्णय आपण करु...
यावर पत्रकारांनी बदलायचा की नाही हे फायनल झालं का? असा सवाल केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी...
नाही, असं ठरलं नाही अजून...
हो असं पण ठरलं नाही.
ते अमित भाई आणि उद्धवजींचा संवाद झाला, तसं आहे.
अमित भाई म्हणाले...
देखते है...
आणि उद्धवजींना वाटलं की, देखते है म्हणजे हो...
असं म्हणत उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याचं एक प्रकारे चंद्रकांत पाटील यांनी मान्य केलं आहे. दरम्यान अमित शहा यांच्या हस्ते नारायण राणे यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन झाले तेव्हा अमित शहा यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य करत. असं काही झालं नाही. असा दावा केला होता. मात्र, त्याच्याच पक्षाच्या नेत्याने अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामधील संवाद पत्रकार परिषदेत सांगितला आहे.
दरम्यान काय म्हटलं होतं अमित शहा यांनी...
महाराष्ट्राच्या जनतेच्या जनादेशाच्या विरोधात सत्तेच्या लालसेपोठी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आलं. जनादेश हा मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता. ते म्हणतात, आम्ही वचन मोडलं आहे. मी तुम्हाला आठवण करुन देतो, आम्ही तर शब्दाचे पक्के माणसं. अशाप्रकारे खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये नितीश यांना वचन दिलं होतं. त्यांनी जनादेशानुसार तुमचा मुख्यमंत्री बसवा, असा आग्रह केला. पण आम्ही वचनाला पक्के होतो, आम्ही नितीश यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं.
एका बंद दराआड चर्चा झालीय. मी वचन दिलेलं. मी कधीच खोलीत करत नाही. जे आहे ते सर्व सार्वजनिक करतो. मी कधीच खोलीचं राजकारण केलं नाही. मी तसं कुठलंच वचन दिलं नाही. तुम्ही मोदीजींच्या नावाने प्रचार केला. आम्ही त्यांच्यादेखत प्रचार केला. त्यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे म्हणालो. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत टाकून ते सत्तेवर बसले आहेत. अशी टीका अमित शहा यांनी शिवसेनेवर केली होती.