मी खोलीचं राजकारण करत नाही, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर अमित शहांचं पहिल्यांदाच जाहीर भाष्य

युती तुटल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा यांचं जाहीर सभेत शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर भाष्य वाचा काय म्हणाले?;

Update: 2021-02-07 10:54 GMT

आज केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या हस्ते खासदार नारायण राणे यांच्या लाईफ टाईम मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालंय. यावेळी नारायण राणे यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल. असं सूचक विधान करत शिवसेनेवर जोरदार टीका केली.

विधानसभा निवडणुका एकत्र लढणाऱ्या शिवसेना भाजपची युती मुख्यमंत्री पदाच्या वादावरून तुटली होती. निवडणुकीपुर्वी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचं ठरले असल्याचा दावा शिवसेनेनं केला होता. मात्र, भाजपने हा दावा फेटाळून लावला होता.

यावर अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन जाहीर सभेत पहिल्यांदाच यावर भाष्य करत शिवसेनेवर टीका केली आहे.

काय म्हटलंय अमित शहा यांनी?

महाराष्ट्राच्या जनतेच्या जनादेशाच्या विरोधात सत्तेच्या लालसेपोठी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आलं. जनादेश हा मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला होता. ते म्हणतात, आम्ही वचन मोडलं आहे. मी तुम्हाला आठवण करुन देतो, आम्ही तर शब्दाचे पक्के माणसं. अशाप्रकारे खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये नितीश यांना वचन दिलं होतं. त्यांनी जनादेशानुसार तुमचा मुख्यमंत्री बसवा, असा आग्रह केला. पण आम्ही वचनाला पक्के होतो, आम्ही नितीश यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं.

एका बंद दराआड चर्चा झालीय. मी वचन दिलेलं. मी कधीच खोलीत करत नाही. जे आहे ते सर्व सार्वजनिक करतो. मी कधीच खोलीचं राजकारण केलं नाही. मी तसं कुठलंच वचन दिलं नाही. तुम्ही मोदीजींच्या नावाने प्रचार केला. आम्ही त्यांच्यादेखत प्रचार केला. त्यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे म्हणालो. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत टाकून ते सत्तेवर बसले आहेत.

अशी टीका अमित शहा यांनी शिवसेनेवर केली आहे.

महाविकास आघाडीवर निशाणा...

महाराष्ट्रात ऑटो रिक्षाची सरकार बनली, ज्याचे तीनही चाकं वेगवेगळ्या दिशेने जात आहेत. एक पूर्व, दुसरा पश्चिम तर तिसरा वेगळ्या दिशेने चालतो.

असं म्हणत महाविकास आघाडीसरकारवर निशाणा साधला आहे.

Tags:    

Similar News