शेतकरी आंदोलनाचा भाजपला फटका : पंजाबमधे सुफडा साफ
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा जबरदस्त फटका भारतीय जनता पार्टीला बसला असून कॉंग्रेसने आज झालेल्या पंजामधील सात महानगरपालिकांमधे निर्विवाद यश मिळवत एकहाती सत्ता संपादित केली आहे.;
कॉंग्रेस पक्षाने आज पंजाबमधील सात महानगरपालिकांचे यश संपादीत केले. मोगा, होशियारपूर, कपूरथला, अबोहर, पठाणकोट, बटाला आणि बठिंडा - हेही शहरातील मनपांचे गेल्या ५३ वर्षानंतरचे सर्वात आश्चर्यकारक निकाल आले आहेत. उद्या मोहालीचा निकाल जाहीर होईल.भटिंडा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) हरसिमरत बादल यांनी केले आहे.
History has been made today!
— Manpreet Singh Badal (@MSBADAL) February 17, 2021
Bathinda will get a Congress Mayor for the 1st time in 53 years!
Thank you to ALL Bathinda residents.
Congratulations to the people of Bathinda for a spectacular victory.
Kudos to all Congress candidates and workers, who toiled for this day. pic.twitter.com/Xvczq5MjfU
केंद्र सरकारने तीन नवीन शेती कायद्याविरोधी हा पक्ष सत्तेतून बाहेर पडला आहे. कॉंग्रेसचे आमदार आणि राज्याचे अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल हे बठिंडा शहरी विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. यावेळी ते शिरोमणी अकाली दल प्रमुख सुखबीरसिंग बादल यांचे चुलत भाऊ असून त्यांनी या निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. कॉंग्रेसने बठिंडामधे ५० पैकी ४३ वॉर्ड जिंकले; अबोहरमध्ये ५० पैकी ४९ वार्ड तर . कपूरथळामध्ये ४० पैकी फक्त ३ वार्ड शिरोमणी अकाली दलाला मिळाले आहेत.
पंजाब कॉंग्रेसचे प्रमुख सुनील जाखड़ म्हणाले की, जनतेने भाजप, शिरोमणी अकाली दल आणि आप या पक्षांचे "नकारात्मक राजकारण" नाकारले आहे. "आम्ही विकासाच्या अजेंड्यावर लढा दिला. या विजयामुळे आम्हाला अधिक परिश्रम करण्याचे प्रोत्साहन मिळेल," असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.खासकरुन भाजपाला शहरी मतदार आधार पक्ष म्हणून पाहिले जात असल्याने आणि गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या रोषामुळं भाजपला जोरदार फटका बसला आहे.