महाविकास आघाडी निवडणूक : येणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या संदर्भाने महाविकास आघाडीची एक महत्वपूर्ण बैठक काल नरिमन पाईंट मुंबई येथे झाली. बैठकीची नियोजित वेळ ही दु. 3:00 वाजताची होती. या बैठकीचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनाही देण्यात आलं होतं. परंतु या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिले नाहीत. तरी सुध्दा प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत येतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
प्रकाश आंबेडकर हे आपल्या सोबत असायला हवेत यासाठी मविआ चे सर्वच प्रयत्न सुरु आहेत. परंतु आजुनही यावर कसला तोडगा निघालेला नाही. वंचित-सेना युती झाली, शरद पवारसोबत चर्चा झाली आहे. काँग्रेसचे काही नेतेही आंबेडकरांच्या संपर्कात आहेत. परंतु मविआ प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी एवढी तत्पर का आहे? हेदेखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे.
वंचितचा 2019 च्या निवडणूकामध्ये फटका
अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, राजू शेट्टी, राजेंद्र शिंगणे, अशा मोठ्या नेत्यांना वंचित आघाडीने विजयापासून लांब ठेवलं होतं.काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वंचितच्या उमेदवारांनी मिळवलेल्या मतांचा फटका चागलाच बसला होता. वंचितचा फायदा भाजपला झाला होता. त्यामुळे युतीचे जवळपास ८-९ खासदार ज्यादा निवडून आले होते.महाविकास आघाडीचे मतदार आणि वंचित बहुजन आघाडीचे मतदार यांमध्ये प्रामुख्याने महायुतीचे मतभेद आणि गैरसमज आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर सोबत आले तर मतदारांमधील विभाजन टाळता येईल. दलित मतदारांमध्ये प्रकाश आंबेडकरांचा मोठा प्रभाव आहे. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो.