मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नवी मुंबईतील वाशी येथील मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाची सांगता करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य करत, त्यांच्या हाती आरक्षणविषयी अध्यादेश सोपवत त्यांना फळांचा रस पाजला यावेळी,"सगळे हट्ट सरकारकडून पुरवले जात आहेत" असं वक्तव्य ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला उद्देशून केलं आहे.
यावेळी माध्यमांशी बोलातना छगन भूजबळ यांनी 'जर ५४ लाख मराठा बांधव आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गात आले तर ओबीसी ला धक्का लागणार नाही का?' असा सवाल उरस्थित केला आहे. ओबीसी ना धक्का मारून बाहेर काढण्याचं काम हे राज्य सरकार करीत आहे पण; ओबीसी समाजही मतदान करतो हे विसरू नका असा इशारा भुजबळ यांनी सरकारला दिला आहे.