मोठी बातमी! निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढवलं, मत मांडण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी

उद्धव ठाकरे यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी अवघे 15 दिवस कालावधी, निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला धक्का, काय संपुर्ण प्रकरण वाचा सविस्तर;

Update: 2022-08-11 15:33 GMT

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यानंतर शिवसेना विरूद्ध एकनाथ शिंदे वाद सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सातत्याने पुढे ढकलली जात आहे. 16 आमदारांच्या निलंबन प्रश्नासंदर्भातील सुनावणी 22 ऑगस्ट ला होणार आहे. ही सुनावणी या अगोदर 8 ऑगस्टला होणार होती. त्यानंतर 12 ऑगस्टला या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या यादीत महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीची तारीख 22 ऑगस्ट दाखवत आहे.

तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने 8 ऑगस्टला शिवसेना आणि शिंदे गटाला 3 वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यास वेळ दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे आपलं म्हणणं मांडण्यासाठी 4 आठवड्याचा कालावधी मागितला होता. मात्र, निवडणूक आयोगाने 4 आठवडे वेळ देण्यास नकार दिला आहे.

Full View

निवडणूक आयोगाने शिवसेनेला 4 आठवड्याऐवजी आता फक्त 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळं शिवसेनेला कुठल्याही परिस्थिती आता 23 ऑगस्टला आपलं म्हणणं मांडावं लागणार आहे. हा शिवसेनेला म्हणजेच उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाने 19 जुलैला निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्यावी तसंच शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला द्याव अशा दोन मागण्या केल्या आहेत. त्यावर निवडणूक आयोगाने दोनही गटाला आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं.

दुसरीकडे शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत 16 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने शिवसेनेची ही मागणी फेटाळून लावत निवडणूक आयोगाला शिवसेनेला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी वेळ द्या. आणि कोणत्याही निर्णयाप्रत येऊ नका अशा तोंडी सूचना केल्या होत्या. त्यानुसार 8 ऑगस्टला शिवसनेने आपलं म्हणणं मांडण्यासाठी 4 आठवड्याचा वेळ मागितला होता. शिवसेनेची या मागणीवर निवडणूक आयोगाने अवघ्या 15 दिवसाचा वेळ दिला आहे.

Tags:    

Similar News

null