समाजवादी पार्टी चे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सोपवला आहे. अखिलेश यादव हे 2019 ला आजमगढ येथून खासदार म्हणून निवडून आले होते. अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामध्ये करहल विधानसभा मतदार संघातून विजय झाले आहेत. त्यामुळे अखिलेश यादव यांनी आजमगढ लोकसभा प्रतिनिधी पदाचा राजीनामा दिला आहे.
अखिलेश यादव यांच्या बरोबरच आजम खान यांनी देखील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत समाजवादी पक्षाला भाजपने जोरदार टक्कर दिली होती. त्यानंतर अखिलेश यादव यांनी लोकसभा सदस्य पदाचा राजीनामा देऊन आता विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी 2024 च्या लोकसभा निवडणूकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय अखिलेश यादव यांनी घेतला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणूकीत अखिलेश यादव यांनी आरएलडीचे नेते जयंत चौधरी यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपला 273 जागांवर तर सपा आणि मित्र पक्षाला 125 जागा मिळाल्या होत्या.