Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan :अमळनेरमध्ये 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan :अमळनेरमध्ये 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन97th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आजपासून या साहित्य संमेलनाची सुरुवात करण्यात होत आहे.
97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (97th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) 2 फेब्रुवारीपासून साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर, जळगावमध्ये (Jalgaon) सुरू झाले आहे. त्यासाठी साहित्यिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी साहित्यिकांसह दिग्गज मंत्री सुद्धा या साहित्य संमेलनास हजेरी लावणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या साहित्य संमेलनकडे लागले आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. साहित्य संमेलनामुळे सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
संमेलनास उपस्थिती राहण्याचे आवाहन
तीन दिवस होणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतर्गत मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, सोमनाथ ब्रह्मे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल यांनी केले आहे.
अमळनेरमध्ये सर्वच फ्लेक्समध्ये राजकारणी कोठेही 'समेलन प्रेसिडेंट'चा फोटो नाही
राजकारण्यांनी अशा व्यासपीठावर जावे की नाही हा वाद तसा जुना. प्रत्येक वेळी तो उद्भवत आला असला तरी अनेक नेते या व्यासपीठावर जात राहिले आहेत. कधी सरकारचे प्रतिनिधी म्हणून तर कधी पक्षाचे प्रमुख म्हणून! हा व्यवहार हाताळणाऱ्या घटक संस्था, आयोजक आणि महामंडळही राजकीय नेत्यांना आवर्जून स्थान देत राहिले. कधी यामागे सरकारी निधी मिळावा अशी याचना होती तर कधी नेत्यांना कशाला दुखवायचे असा मानभावीपणा. या ‘आतल्या’ बाजूवर पांघरुण घालत संमेलन पार पाडणाऱ्या साऱ्यांनी नेत्यांच्या या हजेरीचे स्वरूप सर्वपक्षीय राहील याची काळजी घेतली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात नागपुरात झालेल्या संमेलनात डावे नेते ए. बी. बर्धन यांना मानाचे स्थान दिले गेले होते. नंतरच्या काळातही शरद पवार, नितीन गडकरी यांची उपस्थिती अनेक ठिकाणी दिसली. सत्ता कुणाचीही असो, त्याचा या हजेरीवर परिणाम झाला नाही. या पार्श्वभूमीवर अमळनेरच्या संमेलनाकडे बघितले तर ही सर्वसमावेशकता वजा झाल्याचे स्पष्टपणे दिसते.