अजित पवार यांनी सांगितला विधानपरिषद जिंकण्याचा फॉर्म्युला
राज्यसभा निवडणूकीतील पराभवानंतर विधानपरिषद निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला काय असणार? हे अजित पवार यांनी उघड केले आहे.;
राज्यसभा निवडणूकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव करून भाजपने महाविकास आघाडीला धुळ चारली होती. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत दगाफटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडी सावधगिरीने पाऊले टाकत आहे. त्यापार्श्वभुमीवर ही विधानपरिषद निवडणूक जिंकण्यासाठीचा फॉर्म्युला अजित पवार यांनी उघड केला आहे.
अजित पवार म्हणाले की, शिवसेनेकडे दोन उमेदवार जिंकण्याइतके मत आहेत. तसंच शिवसेनेला पाठींबा देणाऱ्या अपक्षांचे अतिरीक्त मतं आहेत. मात्र राष्ट्रवादीचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता येणार नसल्याने राष्ट्रवादीला कट टू कट मत मिळणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्याची मदार अपक्षांवर असणार आहे. त्यापार्श्वभुमीवर अजित पवार यांनी विजयाचा फॉर्म्युला सांगितला आहे.
अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सर्व जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच जो उमेदवार 26 चा आकडा गाठायला कमी पडेल त्याची विकेट नक्की पडेल, असं सांगत अजित पवार यांनी 26 मत मिळवू शकणारा उमेदवार विजयी होईल आणि हाच विजयाचा फॉर्म्युला असल्याचे म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांनीही भाजप जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
धानपरिषद निवडणूकीच्या मतदानाला दोन दिवस बाकी असतानाच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यापार्श्वभुमीवर चंद्रकांत पाटील यांनी कुणाची विकेट पडणार याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
राज्यसभा निवडणूकीत भाजपने महाविकास आघाडीचा पराभव केल्यानंतर विधानपरिषद निवडणूकीत कोण बाजी मारणार? असे तर्क वितर्क लढवले जात आहे. त्यापार्श्वभुमीवर आमचे सर्वच उमेदवार निवडून येणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कुणाची विकेट पडणार? याबाबत चंद्रकांत पाटील सूचक विधान केलं आहे.
विधानपरिषद निवडणूकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे एका उमेदवाराची विकेट पडणार हे निश्चित आहे. मात्र हा उमेदवार कोणत्या पक्षाचा असणार? असा प्रश्न चर्चिला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर चंद्रकांत पाटील यांना कुणाची विकेट पडणार याबाबत विचारले होते. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकारणामध्ये प्रत्येकाने निवडणूक जिंकुस्तोवर जिंकण्याचा दावा करायचा असतो. सध्या घोडेमैदान लांब नाही. त्यामुळे 20 जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतमोजणीला सुरूवात होईल आणि सात ते साडेसात वाजेपर्यंत निवडणूकीचा निकाल स्पष्ट होईल. त्यामध्ये महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराची विकेट पडेल, असे सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या दाव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सर्व जागा निवडून आणेल. मात्र ज्यांना 26 चा आकडा गाठता येणार नाही त्यांची विधानपरिषद निवडणूकीत विकेट पडेल असंही अजित पवार म्हणाले.