विधानसभेत सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक रंगली. साखर काऱखान्यांच्या विक्रीमधील घोटाळा प्रकरणी अण्णा हजारे यांनी चौकशीची मागणी केली आहे, त्या मागणीवरुन विरोधकांनी सभागृहात जोरदार गदारोळ केला. या वादात अखेर अजित पवार यांनी स्वत: भाग घेत उत्तर दिले. तसेच साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशातील अनेक नेत्यांचा गैरसमज झाला आहे, असेही सुनावले. तसेच फडणवीस यांच्या काळातच आपल्याला एका चौकशीत क्लीन चिट मिळाली होती, याचीही आठवण त्यांनी करुन दिली. तसेच सर्व तपास होऊ द्या मग दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल, असेही अजित पवार यांनी बजावले.