31 जुलै पर्यंत MPSC च्या सर्व जागा भरल्या जाणार: अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
MPSC ची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा प्रश्न विधानसभेतही उपस्थित करण्यात आला. सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यां संदर्भात प्रश्न उपस्थित करत स्वप्नील लोणकर च्या आत्महत्येबाबत सरकारला जाब विचारला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात सभागृहात बोलताना 31 जुलै पर्यंत MPSC च्या सर्व जागा भरल्या जातील अशी घोषणा केली आहे.
दरम्यान अजित पवार यांच्या या घोषनेनंतर दिपक लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना टोकाचं पाऊल उचलायला लागावं. ही चांगली गोष्ट नाही. गेलेला जीव परत येत नाही. असं म्हणत सरकारवर शरसंधान साधलं आहे.