Ajit Pawar On Maharashtra Political Crisis | अजित पवार म्हणतात ‘तोपर्यंत’ सरकारला धोका नाही

मुंबई – काही तासातच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. अशा परिस्थितीत अनेकजण अंदाज वर्तवले जात आहेत.;

Update: 2023-05-11 04:20 GMT

मुंबई – काही तासातच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. अशा परिस्थितीत अनेकजण अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जोपर्यंत शिवसेना-भाजपकडे बहुमत आहे, तोपर्यंत या सरकारला काही धोका नाही. (NCP Leader Ajit Pawar On Political Crisis)

जून २०२२ मध्ये महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप झाला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी बंड केलं. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हंही एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) गटाला देण्याचे आदेश दिले होते.

महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेल्या याप्रकरणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालय देणार आहे. दरम्यान, याप्रकरणी अजित पवार यांनी रोखठोक भुमिका व्यक्त केलीय. जोपर्यंत शिंदे-फडणवीस सरकारकडे आमदारांचं बहुमत आहे, तोपर्यंत या सरकारला कुठलाही धोका नसल्याचं पवार यांनी म्हटलंय.

अजित पवार पुढे म्हणाले, “ “ज्या दिवसापासून केस दाखल केली, तेव्हापासून चर्चा चालू आहे. ही गोष्ट जूनमध्ये घडली. आज जवळपास मे महिना आहे. बहुतेकजण म्हणत होते की मे महिन्यात सुट्या लागतात. त्याआधी याबद्दलचा निकाल लागेल. त्यानुसार आता निकाल येतोय”, असं अजित पवार यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. कदाचित सर्वोच्च न्यायालय हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही अजित पवार म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारकडे १४५ पेक्षा जास्त आमदारांचं बहुमत आहे, त्यामुळं ते सरकार चालवत आहेत. अनेकांनी सरकार घटनाबाह्य वगैरे असल्याचं म्हटलं. म्हणायला जरी तसं असलं तरी, सरकार तेच चालवत आहेत. निर्णय घेत आहेत. १४५ आमदारांचं पाठबळ जोपर्यंत शिंदे-फडणवीस सरकारकडे आहे, तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

Tags:    

Similar News