भाजपसोबत जाणार का? अजित पवार स्पष्टच बोलले
Ajit pawar : अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चेवर अखेर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले.
Ajit pawar News : गेल्या काही दिवसांपुर्वी अजित पवार पुणे दौऱ्यावर असताना अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीची चर्चा सुरु झाली. मात्र त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र आता अजित पवार पुन्हा भाजपसोबत जाणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यामुळे अजित पवार चर्चेत आहेत. मात्र या चर्चांवर अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
अजित पवार (Ajit pawar) म्हणाले, तुम्ही माझ्याबद्दल ज्या बातम्या पसरवत आहात. त्या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही. कारण मंगळवारी आणि बुधवारी आमदारांच्या कमिट्यांच्या बैठका असतात. त्यामुळे अनेक आमदार हे मंत्र्यांच्या भेटीसाठी येत असतात. त्यातच मी मुंबईत (Mumbai) असल्याने ते मला भेटायला आले होते. त्यात वेगळा अर्थ काढू नका, असा इशाराच अजित पवार यांनी दिला आहे.
मी 40 आमदारांच्या सह्या घेतल्या असल्याचे वृत्त खोटं आहे. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचेच आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत. त्यामुळे या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही, असं अजित पवार म्हणाले.
तसेच अजित पवार यांनी सामनाच्या रोखठोकमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मांडलेल्या भूमिकेवर टीका केली. ज्या पक्षाचं मुखपत्र आहे. त्या पक्षाबद्दल त्यांनी लिहावं. त्यांनी आमचं वकीलपत्र घेण्याची गरज नसल्याचं वक्तव्य करत अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. (Ajit pawar Criticize to Sanjay Raut)