आमदारांना नेणारी हेलिकॉप्टर, विमानं गेली कुठं? अजित पवार यांचा भाजपला खोचक टोला
Ajit pawar News : कर्नाटक विधानसभा (Karnataka Election) निवडणूकीचा निकाल येत असताना अनेक माध्यमांमध्ये हेलिकॉप्टर तयार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र त्यानंतर कर्नाटकचा निकाल (Karnataka Election Result) स्पष्ट झाला. तिथे काँग्रेसला स्पष्ट बहूमत मिळाले. त्यावरून अजित पवार यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे.;
कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक निकाल येत असताना अनेक माध्यमांमध्ये हेलिकॉप्टर तयार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्यानंतर काँग्रेस स्पष्ट बहूमतात सत्तेत आलं. त्यावरून अजित पवार (Ajit pawar) यांनी भाजपला खोचक टोला लगावला.
अजित पवार यांनी कर्नाटकमधील निवडणूकींच्या निकालांच्या वेळीचा प्रसंग सांगितला. निकाल येत असताना एका राजकीय पक्षाने आमदारांना हैद्राबादला (hyderabad) नेण्यासाठी हेलिकॉप्टर तयार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र काँग्रेसचा आकडा 135 च्या पुढे गेल्याने आमदारांचं गणित जुळवणे शक्य झाले नाही. पण जर हा आकडा 100 ते 110 च्या दरम्यान असता तर काही पक्षांची मदत घेऊन सरकार स्थापन करता आलं असतं. त्यानुसार या बातम्या येत होत्या. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे राजकारणात वेळ पाहून निर्णय घ्यावे लागतात. तशी तयारी असावी लागते. पण कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहूमतात सत्तेत आल्यानंतर ती हैद्राबादला जाणारी विमानं आणि हेलिकॉप्टर कुठे गेले? असा खोचक सवाल अजित पवार यांनी भाजपला लगावला.Ajit pawar criticize to BJP on karnataka Election Result