मिमिक्रीवरून अजित पवार यांचा राज ठाकरे यांना खोचक टोला
मिमिक्रीवरून अजित पवार यांचा राज ठाकरे यांना खोचक टोला;
Raj Thackeray : राज ठाकरे यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली होती. त्यावरून अजित पवार यांनी राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला
आहे.
शरद पवार (Sharad pawar) यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी अजित पवार यांची मिमिक्री केली होती. त्यावरून अजित पवार यांनी राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला. अजित पवार (Ajit pawar) हे बारामती येथे माध्यमांशी बोलत होते.
अजित पवार यांनी राज ठाकरे यांनी केलेल्या मिमिक्रीवर टिपण्णी केली. यावेळी अजित पवार म्हणाले, शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांच्याकडे दुसरं काहीच काम राहिलं नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी पक्ष वाढवण्यापेक्षा त्यांना जर अजित पवार यांची मिमिक्री करून समाधान मिळत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा. कारण अजित पवार यांची मिमिक्री करणे, व्यंगचित्र काढणे हा राज ठाकरे यांचा जन्मसिध्द हक्क आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांचे 14 आमदार निवडून आले होते. त्यानंतर 2014 मध्ये जुन्नरमधून शरद सोनवणे (Sharad Sonawane) यांनी मनसेकडून तिकीट घेतल्याने एक आमदार होता. त्यानंतर कल्याणच्या सहकाऱ्याने त्यांची पाटी लावली. त्यामुळे राज ठाकरे यांचा पुन्हा एक आमदार आला. पण राज ठाकरे यांनी पक्ष वाढवण्यापेक्षा अजित पवारची मिमिक्री (Ajit pawar Mimicry) करणे, अजित पवारचे व्यंगचित्र काढणे यात जर समाधान मिळत असेल तर माझ्या राज ठाकरे यांना शुभेच्छा आहेत.