Ajit Pawar : सोशल मीडियावरील NCP चे वॉलपेपर हटवून अजित पवार पुन्हा चर्चेत

महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चा आता अधिक वेगानं सुरू झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP – Nationalist Congress party) नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील अधिकृत अकाऊंटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्हं असलेले सर्व बॅनर्स हटवले आहेत;

Update: 2023-04-18 07:45 GMT

महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चा आता अधिक वेगानं सुरू झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP – Nationalist Congress party) नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील अधिकृत अकाऊंटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्हं असलेले सर्व बॅनर्स हटवले आहेत. त्यामुळं चर्चेला अधिक उधाण आलंय.




 



अजित पवार हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) सकाळी अजित पवार यांच्या सर्व अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्हं आणि शरद पवारांसोबतचं (Sharad Pawar) वॉलपेपर डिलिट करण्यात आलंय. यावेळी वॉलपेपर अपलोड केल्यानंतर आपोआप दिसणा-या सर्व पोस्टसुद्धा डिलिट करण्यात आल्या आहेत, त्यामुळं राजकीय गुंतागुंत अधिक वाढलीय.


कधी तब्येतीचं तर कधी स्थानिक निवडणुकांचं कारण देत अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या बैठका असो की सभा यामध्ये फार सक्रियता दाखवली नाही. तेव्हापासूनच त्यांच्या अस्वस्थतेच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळं ही अस्वस्थता पाहता ते महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का इथपर्यंत या चर्चा सुरू झाल्या होत्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशावेळी सावध भुमिका म्हणून भाजपकडून अजित पवारांकडे पर्याय म्हणून तर बघितलं जात नाही ना, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

इतिहासाची पुनरावृत्ती होईल असंही काही राजकीय निरीक्षकांना वाटतंय. कारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांनी काही तासांसाठी का होईना पण भाजपसोबत (BJP) जाऊन सरकार स्थापन केलं होतं. मात्र, त्यावेळी शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर ते सरकार कोसळळं होतं. मात्र, आता पुन्हा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झालीय.

Tags:    

Similar News