शरद शादाब असते तर ते भाजपची 'बी' टीम असते- असदुद्दीन ओवैसी

नागालँड निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी गरज नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भाजप प्रणित आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. या घडामोडीवरुन आता देशाच्या राजकारणात पडसाद उमटू लागले आहेत.

Update: 2023-03-09 07:54 GMT

नागालँडमध्ये (Nagaland) पार पडलेल्या निवडणूकीनंतर आता इथे सत्तास्थापनेसाठी घडामोडींना वेग आला आहे. येथील निकाल हाती आल्यानंतर आता गरज नसतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजप प्रणित आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एमआयएम (MIM) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) ७ आमदार निवडून आल्यामुळे त्यांनी आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या समर्थनासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी जो निर्णय घेतला, त्यावरुन आता देशाच्या राजकारणात टीका करण्याचे सत्र सुरु झाले आहे. याबाबत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शरद 'शादाब' असते तर त्यांनाही 'बी' टीम म्हटले असते, अशी टिका केली आहे. 'सेक्युलर' साठी अस्पृष्य मानले गेले असते. मी कधीही भाजपा (BJP) सरकारला पाठिंबा दिला नाही आणि देणारही नाही. परंतु दुसऱ्यांदा राष्ट्रवादीने (NCP) भाजपला पाठिंबा दिला आहे आणि हे शेवटचे सुद्धा असू शकत नसल्याचा टोला ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात ज्या पक्षाच्या मंत्र्याला भाजपने जेलमध्ये टाकले त्याच पक्षाने भाजपला नागालँडमध्ये सत्तेसाठी समर्थन केल्याची टिका ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी शरद पवार यांच्यावर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांच्या पाठिंबाच्या निवेदनानतंर औवैसींनी ही टीका केली आहे. नागालँड (Nagaland) राज्याच्या व्यापक हिताचा विचार करुन पवार यांनी हा पाठिंबा दिल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. पक्षाने हा निर्णय स्थानिक पदाधिकारी आणि नवनियुक्त आमदार यांच्या सल्ल्याने घेतल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री पदाची नेफ्यू रियो यांनी शपथ घेतल्यानंतर कॅबिनेटमध्ये भाजपचे (BJP) ५ तर एनडीपीपीचे (NDPP) ७ मंत्र्यांचा समावेश आहे. नागालँड निवडणुकीत रिया यांच्या नेतृत्त्वात एनडीपीपी (NDPP) भाजपा युतीने विजय संपादन केला आहे. २०१८ मध्ये रियो यांनी भाजपशी आघाडी केली. त्यानंतर गेल्या निवडणुकीत या आघाडीने नागालँडमध्ये (Nagaland) ३० जागांवर विजय संपादन केला. तर यावेळी ३७ जागांवर या आघाडीने विजय प्राप्त केला. भाजपाने या निवडणुकीत २० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर एनडीपीपीने (NDPP) ४० जागांवर उमेदवार उभे केले होते. यामध्ये भाजपने (BJP) १२ तर एनडीपीपने (NDPP) २५ जागांवर विजय मिळवला. 

Tags:    

Similar News