औरंगाबाद: खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन 'जलील काय चीज आहे', हे लोकसभेत दाखवतो असा इशारा अधिकाऱ्यांना दिला आहे.
जलील यांनी बुधवारी विविध विषयांवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याने, त्यांची व्यथा आणि प्रश्न मांडण्यासाठी कामगार उपायुक्तांची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर माझ्यावर दंगलीचे आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले.
तसेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणला, मात्र त्या अधिकाऱ्यांची पोलखोल लोकसभेत पुराव्यासहित करेल आणि जलील काय चीज आहे, ते दाखवून देईल असं जलील म्हणाले.