''साहेब जरा.. '' Raj Thackeray यांच्या पत्राला शेतकऱ्याचं उत्तर

राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक पत्र लिहीत सरकारला ( Maharashtra government ) ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्याच्या या ट्विट वर आता अनेक प्रतिकिया येत आहेत. या सगळ्या प्रतिकीयांध्ये त्यांना एका शेतकऱ्याने उत्तर दिले आहे. काय म्हंटल आहे त्या शेतकऱ्याने पाहुयात...

Update: 2022-10-20 11:07 GMT

आज राज ठाकरे यांनी सरकारला पत्र लिहीत ( Raj Thackerays Letter to Maharashtra CM ) राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर संपूर्ण पीक पाण्यात गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा ( Wet Drought ) अशी मागणी मनसे ( MNS ) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यांनी हे पत्र त्याच्या ट्विटर हँडेलवर शेअर केले आहे. त्यांच्या या ट्विटला महाराष्ट्रातील अनेक लोकांनी प्रतिसाद दिला असून, त्यातील एकाने ''साहेब जरा प्रत्यक्ष येऊन पहा माझ्या शेतात '' अशी मागणी केली आहे.

राज ठाकरे यांनी जे पत्र ट्विटरवर शेअर केले आहे त्यावर आता अनेक कॉमेंट, रिट्विट येत आहेत. नक्की काय कॉमेंट आल्या आहेत त्या देखील आपण पाहुयात. तर अरुण मोरे यांनी राज ठाकरेंना कॉमेंट करत म्हंटल आहे की, ''साहेब सरकार मदत करेल तेव्हा करेल. पण पीक विमा योजनेत सामील शेतकऱ्यांना 100% परतावा मिळवा, एवढे झाले तरी आभारी राहू. ₹4500/- विमा हफ्ता भरला आहे. विमा योजना किमान प्रामाणिक पणे राबवण्यात यावी एवढीच अपेक्षा.''

खरतर महाराष्ट्रत शेतकऱ्यांची काय परिस्थिती झाली आहे हे आपण पाहतोच आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी सर्वत्र मागणी देखील होत आहे. त्यात राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अभिजीत या ट्विटर वापरकर्त्याने त्यांना रिट्विट करत म्हंटले आहे की, ''धन्यवाद शेतकऱ्यांसाठीपण पत्र लिहिल्याबद्दल. पण तुमच्या प्रिय मित्राला पण एक प्रत पाठवायला विसरू नका. शेवटी मित्र उप जरी असला तरी सरकारमध्ये मुख्य भूमिका तुमच्या प्रिय मित्राचीच आहे. जसं तुमच्या पत्रानंतर पटकन उमेदवार मागे घेतला तशी नुकसान भरपाई पण पटकन मिळेल हीच अपेक्षा.''

लहू मडके या ट्विटर वापरकर्त्याने तर राज ठाकरेंचे आभार मनात म्हंटले आहे की, ''Yess.. साहेब,हिच आपेक्षा होती आपल्याकडुन...खुप खुप धन्यवाद..

आसेच आपन शेतकर्‍यांच्या सोबत रहा. शेतकरी पण आपल्या सोबत राहतीलच. शेतकरी कधी आपल्यावर केलेल्या मदतीची मांडवली करत नाही. धन्यवाद साहेब.''

तर अशा प्रकारे राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेचं, त्यांनी लिहिलेल्या पात्रच कौतुक करणारे अनेक रिट्विट आले आहेत. आता जशा कौतुक करणाऱ्या कॉमेंट आहेत तशी अनेकांनी टीका देखील केली आहे. Ghag&वैभव हे ट्विटर वापरकर्ते म्हणतायत की, ''राज sir ek पत्र स्वतःला पन लिहा. कोण होतास तू काय झालास तू !!!''

Aata Petnar हे ट्विटर यूजर राज ठाकरेंच्या पात्राला रिट्विट करत म्हणत आहेत की, ''जितनी चाबी भरी राम ने, उतना चले खिलोना.. ''

राज ठाकरे नेहमीच राज्यात घडत असणाऱ्या घटनांवर आपली भूमिका ट्विटरच्या माध्यमातून मांडत असतात. आता मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी अशाच प्रकारे एक पत्र लिहून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकी विषयी त्यांची भूमिका मांडली आणि त्यानंतर काय घडलं आपण सर्वानी पहिले. त्यामुळे काही लोकांनी राज ठाकरेंच्या या पत्रावर टीका जरी केली असली तरी त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचं मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे...

Tags:    

Similar News