मंदीर उघडण्यासाठी घंटा वाजवणारे फडणवीस म्हणतात शाळा उघडा दमानं....
कोरोना महामारीच्या काळात मंदीरं उघडण्यासाठी राज्यभर घंटानाद आंदोलन करणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता शाळा उघडण्याचा निर्णय विचार करुन घ्यावा असं सांगितलं आहे.;
जगात देशात आणि राज्यात कोरोना जागतिक महामारीनं धुमाकुळ घातला असताना गेल्या महीनाभरात महाराष्ट्रातील कोरोना उद्रेक मंदावल्यानंतर मंदीरं उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं राज्यभर घंटानाद आंदोलन करुन महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं होतं. राज्यातील सरकार हिंदुविरोधी असल्याचा आरोपही भाजपं कडून करण्यात आला होता. भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीनं मंदीरं उघडली नाही तरं टाळी तोडू असा इशारा दिला होता.
नुकत्याच झालेल्या छटपुजेसाठी भाजपशासित राज्यात बंदी असताना महाराष्ट्रात छटपुजेची परवानगी द्या अशी अजब मागणी भाजपनं केली होती. आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाळा प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी शाळा उघडण्याचा निर्णय विचार करुन घ्यावा असं म्हटलं आहे. शिक्षकांची कोरोना टेस्ट केली पाहीजे. राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळं विभागनिहाय कोरोना आढावा घेऊनच शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घ्यावा असं म्हटलं आहे.
एका बाजून मंदीरं उघडण्यासाठी आकाशपातळं एक करणारं भाजपं शाळांबाबत कसं ताळ्यावर आलं असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.