एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट

सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.;

Update: 2023-05-11 09:05 GMT

सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

सत्तासंघर्षावर आलेल्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांची मागणी फेटाळत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे राजीनामा देणार नसल्याचे म्हंटले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले होते की, जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंड केले होते. त्यामुळे ज्यांना आम्ही मोठं केलं. त्यांच्या अविश्वासाला सामोरे जाण्याऐवजी मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चपराकीनंतर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा हा नैतिकतेच्या नाही तर लाजेपोटी आणि भीतीपोटी दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत. कारण भाजप सोबत निवडून येऊन नंतर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेलात तेव्हा नैतिकता कुठल्या डब्ब्यात टाकली होती, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची कुठलीच गरज नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. 

Tags:    

Similar News