राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी पहिली सभा छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात म्हणजे येवल्यात घेतली आणि या सभेला अनेक लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे शरद पवारांची दुसरी सभा बीड शहरात होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले, जे नेते अनेक दिवस राष्ट्रवादी बरोबर काम करत होते,तेच नेते सत्तेसाठी भाजपसोबत राज्याच्या राजकारणात सामील झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत मोठे फेरबदल झालेत, मात्र बीड जिल्ह्यात चार मतदार संघात राष्ट्रवादीने विधानसभेला बाजी मारली होती आणि दोन मतदारसंघावर भाजपची सत्ता होती. आता येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत कशा पद्धतीने जिल्ह्यात परिवर्तन होत आहे, हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्षपद आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन सभा घेण्याचे काम सुरू केलं आहे. येणाऱ्या 17 ऑगस्ट रोजी शरद पवार यांची सभा या बीड शहरात होणार आहे.