लोकसभा निवडणूकानंतर राहूल गांधीना आम्ही गजाआड करू- हिमंत सर्मा

Update: 2024-01-25 14:22 GMT

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा यांनी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला चढविला आहे. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर राहुल गांधींना गजाआड टाकु असा धमकी वजा इशारा हिमंत बिस्वा सर्मा यांनी दिला होता. या घटनेचा आपल्या एक्स अकाउंटवरुन निषेध करत काँग्रेस नेते प्रियांक खर्गे यांनी लोकसभेची वाट न पाहता राहुल गांधींना आत्ताच का अटक करत नाहीत ? असा प्रश्न उपस्थित केला. याच पोस्ट ला रीट्वीट करत या निवडणूक काळात गांधी आम्हाला हवे आहेत. अशी पोस्ट सर्मा यांनी एक्स हॅन्डलवर शेअर केली आहे. “हिमंत बिस्वा सर्मा लोकसभेपर्यंत वाट कशाला बघता? आताच राहुल गांधींना अटक करा? जर राहुल गांधीने कायद्याचे उल्लंघन केलं असेल तर त्यांना आत्ताच का अटक करत नाहीत? कारण तुम्हालाही हे ठाऊक आहे की ते खरं बोलातात

तुमच्या बाजूला असलेल्या मणिपूरला तुम्ही बघितलं नसून आसामच्या सामान्य जनतेला लुटत आहात उलट राहूल गांधी हे जनतेची बाजू मांडतात आणि जनता ही त्यांना पाठिंबा देत आहे. यामूळे तूम्ही भयभयीत झाला आहात. राहूल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला शहरातील वाहतूक कोंडीच्या कारणावरुन गुहाटीत प्रवेश दिला गेला नाही. पण गुहाटीत पोलीसांनी उभारलेले बॅरीकेड काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषना देत तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विविध कलमांतर्गत राहूल गांधी, जितेंद्र सिंह, के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश, श्रीनिवास बिवी, कन्हैया कुमार, गौरव गोगोई यांच्यासह अन्य काही नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.


यासंदर्भात सर्मा बोलताना म्हणाले की, एफआयआर च्या व्यतिरीक्त विशेष चौकशी पथक स्थापक करण्यात आलं आहे. लोकसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर राहून गांधी यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात येईल विशेष म्हणजे आसाम पोलीसांनी हा खटला आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे पाठवला आहे.

Tags:    

Similar News