संजय राऊत यांची बॅटिंग आणि भाजपचा थयथयाट, ट्वीटरवर रंगले युध्द

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी वाद टोकाला गेला आहे. मात्र संजय राऊत महाविकास आघाडी सरकारची खिंड लढवत राजकारणात जोरदार बॅटिंग करत असतात. त्यातच संजय राऊत यांनी क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग करत जोरदार फटकेबाजी केली. तर संजय राऊत यांचा व्हिडीओ ट्वीट करून भाजपनेही थयथयाट केला आहे.;

Update: 2022-05-07 03:19 GMT

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे. मात्र संजय राऊत राजकीय फटकेबाजी करत महाविकास आघाडीची खिंड लढवत असतात. दरम्यान संजय राऊत क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजी करताना दिसून आले. तर संजय राऊत यांच्या क्रिकेटवरून भाजपने संजय राऊत यांना ट्रोल केले आहे.

राजकीय मैदानावर फटकेबाजी करणारे संजय राऊत पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी थेट क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी केली. तर संजय राऊत यांनी क्रिकेटच्या मैदानावरचा फोटो ट्वीट केला आहे. त्यावर 'आज' असे कॅप्शन दिले आहे. मात्र संजय राऊत यांनी क्रिकेटच्या मैदानावरचा फोटो ट्वीट केल्यानंतर संजय राऊत यांना भाजपने जोरदार ट्रोल केले आहे.

संजय राऊत यांच्या ट्वीटवर माजी खासदार निलेश राणे यांनीही प्रतिक्रीया दिली आहे. त्यामध्ये निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा व्हिडीओ ट्वीट केला. त्यामध्ये संजय राऊत हे चेंडूचा सामना करताना धडपडताना दिसत आहेत. त्यावरून निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत हे चेंडूचा सामना करताना ध़डपडत असल्याचे ट्वीट केले आहे,

मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रीया देतांना फैजल खान या ट्वीटर अकाऊंटवरून प्रविण दरेकर हे क्रिकेट खेळताना ध़डपडत जमीनीवर कोसळल्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

पंतप्रधान 0.0 या अकाऊंटवरून बॉलरला भाजपने माझ्याविरोधात चिथावणी दिली असे म्हणत टोला लगावला आहे.

Tags:    

Similar News