संभाजी राजेंची माघार, आघाडीतील मतभेद उघड
संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली. मात्र संभाजी राजे यांनी माघार घेतल्यानंतर महाविकास आघाडीतील मतभेद उघड झाले आहे.;
शिवसेनेने सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेतून केली. यावेळी मला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेला शब्द मोडला. मुख्यमंत्र्यांकडून अशी अपेक्षा नव्हती, अशी टीका संभाजी राजे यांनी केली. त्यानंतर भाजपने महाविकास आघाडीवर टीका केली. मात्र आता महाविकास आघाडीतच संभाजी राजे यांच्या माघारीवरून बिघाडी झाल्याचे चित्र आहे.
संभाजी राजे यांच्या निवडणुकीतील माघारीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भुमिका ट्वीट करून जाहीर केली. त्यामध्ये नाना पटोले म्हणाले की, संभाजी राजे खासदार झाले नाहीत. हे खरंच दुर्दैवी आहे. परंतू काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठींबा राहील.
याबरोबरच पुढे असे म्हटले आहे की, इतर पक्षांचे माहित नाही. परंतू संभाजी राजे राज्यसभेत जावे ही काँग्रेसची मनापासून इच्छा आहे. महाराष्ट्राच्या नेतृत्वाची वेगळी शान त्यांच्यामुळे होती. ते खासदार झाले नाहीत हे दुर्दैव. मात्र संभाजी राजेंना काँग्रेसचा नेहमीच पाठींबा राहील.
संभाजीराजे खासदार झाले नाहीत हे खरंच दुर्दैवी ! परंतु काँग्रेसचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील.#SambhajirajeChhatrapati pic.twitter.com/v9rS8Cte75
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 27, 2022
अपक्ष निवडणूक लढवण्याची केली होती घोषणा
संभाजी राजे यांनी 12 मे रोजी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन आपण अपक्ष निवडणुक लढवणार असल्याची घोषणा केली होती. तसेच सर्व पक्षांनी माझ्या उमेदवारीला पाठींबा द्यावा, अशी मागणी संभाजी राजे यांनी केली होती. मात्र शिवसेनेने शिवबंधन बांधल्याशिवाय संभाजी राजेंना पाठींबा नाही, अशी भुमिका घेतली आहे. मात्र संभाजी राजे यांनी शिवसेनेचा उमेदवार होण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने निष्ठावंत कार्यकर्ते संजय पवार यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अखेर संभाजी राजे यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली.