केंद्र सरकारने १०२ व्या घटनादुरुस्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका वठवणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांच्याशी या संदर्भात आमचे प्रतिनिधी विकास चौधरी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी ओबीसीच्या आरक्षणासाठी सर्व पक्ष रस्त्यावर उतरतात तर मग मराठा समाजाच्या आरक्षणासाठी का एकत्र येत नाहीत? असा सवाल करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारने या संदर्भात तात्काळ पावलं उचलण्याची मागणी केली. तसंच राज्यसरकारने नेमलेल्या मागासवर्गीय आयोगावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पाहा काय म्हटलंय आबासाहेब पाटलांनी