700 शेतकरी शहीद, शहीद शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 कोटी रुपये द्या, वरुण गांधींचं मोदींना पत्र...

वरुण गांधी यांची ही मागणी तुम्हाला योग्य वाटते का?

Update: 2021-11-20 10:57 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचं भाजप खासदार वरुण गांधी यांनी स्वागत केलं आहे. तसंच वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही देखील लिहिले आहे.

या पत्रात वरुण गांधी यांनी

मी तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेचे स्वागत करतो. शेतकरी बांधव आंदोलन संपवून सन्मानाने घरी परतावेत. माझी नम्र विनंती आहे की, एमएसपी व इतर मुद्द्यांवर कायदा करण्याच्या मागणीवरही त्वरित निर्णय घेण्यात यावा.

या पत्रात त्यांनी लखीमपूर खेरीची घटना लोकशाहीला लागलेला कलंक आहे. या प्रकरणाशी संबंधित मंत्र्यांवर कठोर कारवाई करावी. त्याचबरोबर देशहिताच्या दृष्टीने हमीभावाचा कायदा करण्यात यावा अशी मागणी केली आहे. तसंच या आंदोलनात 700 शेतकरी शहीद झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रत्येकी 1 कोटींची भरपाई द्यावी. अशी मागणी या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार वरुण गांधी सध्या स्वपक्षाला खडे बोल सुनावत असल्यानं चांगलेच चर्चेत आहे. तीन कृषी कायदे, लखीमपूर खेरी येथील घटना आणि कंगना रणौत च्या 'भीक मे मिली आझादी' या वक्तव्यावर वरुण गांधी यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळं ते भाजपला राम राम करणार असल्याची शक्यता आहे. मात्र, वरुण गांधी भाजपला राम राम करुन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार की ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Tags:    

Similar News