भाजपने घेतला निवडणूकीचा धसका, केंद्रीय मंत्र्यांना उतरवले थेट विधानसभेच्या रिंगणात

डिसेंबर अखेर पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र केंद्रीय मंत्री असलेल्या तीन मंत्र्यांना भाजपने विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.;

Update: 2023-09-26 03:55 GMT
भाजपने घेतला निवडणूकीचा धसका, केंद्रीय मंत्र्यांना उतरवले थेट विधानसभेच्या रिंगणात
  • whatsapp icon

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच भाजपने मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी 78 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये भाजपने तीन केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

भाजपने मध्यप्रदेश जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यातच कोणत्याही परिस्थितीत मध्य प्रदेशमध्ये विजय मिळावा, म्हणून भाजपने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल, फग्गन सिंह कुलस्ते यांना विधानसभा निवडणूकीची उमेदवारी दिली आहे. त्याबरोबरच भाजपचे लोकसभेतील प्रतोद राकेश सिंह यांच्यासह खासदार रिती पाठक, गणेश सिंह, उदयसिंह प्रताप या चार खासदारांना आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या कैलास विजयवर्गीय यांनाही भाजपने विधानसभा निवडणूकीचे तिकीट दिले आहे.

भाजपने मध्यप्रदेश विधानसभा निवडणूकीच्या 78 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असल्याने या यादीतून भाजपमधील अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे.

Tags:    

Similar News