मॉस्को डायरी..

Update: 2017-09-08 14:46 GMT

रशियाला दिलेल्या भेटीत माझे अविस्मरणीय अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करतोय. रशियाची राजधानी मॉस्को आता 870 वर्षांची झाली आहे. मॉस्को ही रशियाची राजधानी आणि एक महाकाय शहर आहे. 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांद्वारे या शहराचा वाढदिवस साजरा करण्यात येतोय.. दररोज सायंकाळी संगीत मैफिली आणि आतिषबाजी होतेय. जगप्रसिद्ध लाल चौकात लष्करी संगीत महोत्सव संपन्न होतायत. भारत आणि इतर देशांमधील लष्करी बँड संगीत सादर करतायत. मला भारतीय संगीत पथकाशी भेटण्याचा योग घडून आला. गेली अनेक शतके रशियन शास्त्रज्ञ, वास्तुविशारद, अंतराळवीर, खेळाडू, संगीतकार आणि लष्कराने आपल्या संशोधन आणि कार्याने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. इथं येणा-या पर्यटकांने रशियन सर्कस नक्की बघावे.

पर्यटकांच्या हातात चक्क AK-47 आणि लष्करातील रणगाडे!

होय, रशियामध्ये मी याचा अविस्मरणीय अनुभव घेतलाय. रशियात अत्याधुनिक शस्त्रनिर्मितीचा मोठा उद्योग आहे. या उद्योगाचा पर्यटनवृद्धीसाठी ते मोठ्या चतुराईने उपयोग करून घेतायत. सेंट पीटर्सबर्गपासून 75 कि.मी. अंतरावरील जंगलात पर्यटकांना रणगाडे चालविण्याची आणि AK-47 रायफलने गोळीबार करण्याची संधी दिली जाते. यासाठी तिथे तैनात असलेले सैनिक तुम्हाला प्रशिक्षणही देतात. अतिशय सुंदर असा अनुभव या ठिकाणी घेतल्याचा मला खूप आनंद होतोय...

 

अंतराळ संग्रहालयाची सफर

रशियाने पृथ्वीच्या कक्षेत सर्वात आधी उपग्रह नेला. त्यांनीच माणसाला पहिल्यांदा अंतराळात पाठविले. त्यांनीच मानवनिर्मित वस्तू पहिल्यांदा चंद्रावर उतरविली. त्यांच्याच अंतराळयानाने सर्वांत आधी चंद्राला धडक दिली, तो एक ऐतिहासिक क्षण होता. मात्र अपोलो-२ अंतराळयानाद्वारे नील आर्मस्ट्राँगला पहिल्यांदा चंद्रावर उतरवून अमेरिकेने रशियावर मात केली आणि मानवाला चंद्रावर पाठविण्याचे रशियाचे स्वप्न भंगले. मॉस्कोतील अंतराळशास्त्र संग्रहालयाला भेट दिली. पृथ्वीची प्रदक्षिणा करणारा युरी गॅगरीन हा पहिला अंतराळवीर रशियाचाच. १२ एप्रिल १९६१ रोजी त्याच्या अंतराळयानाने पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली. या अंतराळयानाच्या प्रतिकृतीमध्ये बसण्याची संधी मला मिळाली. सोव्हिएत अंतराळ संशोधनाच्या शर्यतीत तसे नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. अंतराळवीर अंतराळात राहतात कसे, ते काय खातात, ते टॉयलेटचा वापर करतात का, कसे कपडे घालतात, ते उभ्याने झोपतात का, माझ्या मनातील अशा अनेक कुतुहलांचा उलगडा या संग्रहालयाला भेट दिल्यानंतर झाला.

 

Similar News