छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर शहारे आल्याशिवायच राहत नाही. त्यांचा गौरवशाली इतिहास आज आपण त्या काळातील गड किल्ले आणि शस्त्रास्त्रांच्या रूपाने जगतोय. पण ही शस्त्र फक्त एका दालनातच आपल्याला पाहता येतात. पंच्याहत्तरी पुर्ण केलेल्या मुंबईतील महाराष्ट्र मंडळाने या गणेशोत्सवात लहानग्यांसोबत थोरा मोठ्यांनाही शिवकालीन शस्त्र पाहता यावीत यासाठी तब्बल ६०० शस्त्रांचं प्रदर्शन भरवलं आहे