LIC संकटात? राहुल गांधीचा मोदींवर पुन्हा हल्ला

LIC चा IPO लाँच होऊन एक वर्षे पूर्ण झाले. मात्र या वर्षभरात LIC गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Update: 2023-05-19 05:09 GMT

सरकारी मालकीची कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या IPO ला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरात LIC च्या आयपीओत 34 टक्क्यांची घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. त्यावरून राहुल गांधी यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मे 2022 मध्ये LIC चं बाजार भांडवल हे 5.48 लाख कोटी इतकं होतं. मात्र वर्षभरातच मे 2023 मध्ये LIC च्या बाजार भांडवलात घसरण 3.59 लाख कोटी इतकी झाली आहे. त्यामुळे वर्षभरात LIC च्या गुंतवणूकदारांना 35 टक्के तोटा झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

पुढे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, साहेबांचा एकच फोकस, शेठला कसं वाचवायचं! जनतेच्या मेहनतीचा पैसा लुटला जाओ नाहीतर शेअर्स धारकांची गुंतवणूक बुडून जावो, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Tags:    

Similar News