जनतेचा जाहीरनामा : पुढील मतदान आम्ही ठरवू, नागरिकांनी असा इशारा का दिला?

Update: 2022-09-16 14:29 GMT
जनतेचा जाहीरनामा :  पुढील मतदान आम्ही ठरवू, नागरिकांनी असा इशारा का दिला?
  • whatsapp icon

मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तरी शहरातील अनेक भागात नागरिकांना मुलभूत सुविधांचा सामना करावा लागतो. मुंबईतील सिद्धार्थ कॉलनीतील वार्ड क्रमांत 156 मध्येही नागरिकांना अशाच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. लोकप्रतिनिधींनी आमच्या समस्या सोडवल्या नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. त्यामुळे पुढील मतदानाच्या वेळी कुणाला मतदान करायचे याचा निर्णय आम्ही घेऊ, असा इशारा त्यांनी दिला आहे.

या वार्डमध्ये नेहमीच नाल्यातील पाणी रस्त्यावर येते आणि रस्त्यावर आलेल्या पाण्यातूनच नागरिकांना वावरावे लागते, अशी त्यांची तक्रार आहे. रस्त्याचे कामही निष्कृष्ट दर्जाचे असल्याचा त्यांचा आरोप आहे. नाल्यातील पाण्यामुळे इथे नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. इथल्या नागरिकांची समस्या जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांनी...


Full View

Tags:    

Similar News