मुलभूत सुविधांची ऐशी तैशी, नागरिक संतप्त
मुंबई महापालिकेची निवडणुक तोंडावर आली आहे. त्यापार्श्वभुमीवर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी विकास केला आहे का? मतदारांना दिलेली आश्वासन पूर्ण केली आहेत का? याच अनुषंगाने जनतेचा जाहीरनाम्यात लोकांनी आपल्या शहराच्या विकासाबद्दल काय व्यथा मांडलेल्या आहेत, पाहुयात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी प्रसन्नजीत जाधव यांच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमातून...;
कचऱ्याचे ढीग, उघडी गटारं, खड्डे पडलेला रस्ता, अस्ताव्यस्त पडलेले पत्रे, न झालेलं गार्डन हे सगळं कुठल्या गावातील नाही. हे आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील. मुंबईतील विक्रोळी भागात नागरिकांच्या प्रश्नाकडे महापालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
मुंबईतील विक्रोळी वॉर्ड क्रमांक 119 मध्ये स्थानिक नागरिकांना शिक्षण, आरोग्य, आणि स्वच्छतेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचे गार्डन बनवण्याचे काम सात वर्षांपासून सुरु आहे. पण स्थानिक नगरसेविका मनीषा लांडे यांनी कधीच लक्ष न दिल्यामुळे या गार्डनचे काम अद्याप ही पूर्ण झाले नाही. तसेच महानगपालिकेच्या मोठ्या रुग्णालयात महिल्यांसाठी सुविधा उपलब्ध नाहीत, डॉक्टर देखील तिथे वेळवर उपलब्ध नसतात, असं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.
स्थानिक नगरसेविकेकडून रस्त्याचं काम पाच वर्षांपूर्वीच सुरु केले होते. पण रस्त्याचे काम आजही अपूर्ण असल्यामुळे अनेक वाहनचालकांचे अपघात होत असतात.
पुनर्वसन आणि विकासाच्या नावाखाली झोपटपट्टी वस्तीतील लोकांना घाणीत हस्तांतरित केल आहे. अनेकदा नगरसेविकेला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सांगून देखील आमच्याकडे दुर्लक्ष केल आहे. आम्ही राहायचं कस आणि जगायचं कस हा रोजचा प्रश्न आमच्यासाठी पडलाय असे तेथील स्थानिक लोक सांगतात.
शहराच्या विकासासाठी तुम्ही निवडून दिलेला नगरसेवक जर महापालिकेमार्फत तुम्हाला मुलभूत सुविधा देऊ शकत नसेल तर पुढच्या वेळी मतदान करताना मतदारांनी विचार करायला हवा, असाच एकंदर या भागातील नागरिकांचा सूर आहे.